गोवर-रुबेलाच्या लसीने नपुंसकत्व, मुस्लिमांचा लसीकरणास नकार...जाणून घ्या काय आहे सत्य

Foto

बुलडाणा– मुस्लिम समाजाला नपुंसक करण्यासाठी भाजप सरकारने गोवर-रुबेला लसीकरणाचे षडयंत्र आखले आहे. असा व्हिडिओ जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. या अफवेमुळे मुस्लिम पालकांनी त्यांच्या पालकास ही लस देण्यास नकार दिला आहे.

महाराष्ट्रात २७ नोव्हेबंरपासून गोवर-रुबेला लस देण्याच्या मोहीमेला सुरुवात झाली आहे. मात्र या अफवमुळे आरोग्य पथकाला मुस्लिम शाळांमधून लस न देताच परतावे लागत आहे. यावर मुस्लीम धर्मगुरू व विविध मुस्लीम धर्म संघटनांनी ही अफवा असल्याचे सांगत आपल्या मुला-मुलींना लस देण्याचे आवाहन केले आहे.

 

काय म्हटले आहे व्हिडिओमध्ये

 

'मुस्लीम कौम को नपुंसक बनाने के लिए भाजप-संघकी सरकारने गोवर-रुबेला लस निकाली है, ये लस अपने बच्चो को मत दिजीए’ अशा आशयाचा एक व्हिडियो व्हायरल होत असल्याच्या चर्चेमुळे मुस्लिम समाज आपल्या पाल्यांना लस देण्यास विरोध दर्शवित आहेत. 

 

मलकापूर मधील १८ शाळा, चिखली, खामगावातील २ आणि बुलडाण्यामधील १ शाळा अशा प्रत्येक तालुक्यातील एक दोन मुस्लीम शाळांमधून लसीकरणास नकार आला आहे. जिल्ह्यातील  आरोग्य विभागाने मुस्लिम धर्म गुरु, सुशिक्षित मुस्लिमांच्या बैठका घेऊन या लसीचे महत्व पटवून ल दिलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम संघटनांनी खोट्या अफवांवर मुस्लीम बांधवांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.